आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रकिया सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील इयत्ता ११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.त्यानुसार महाराष्ट्र राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य सीबीएसई, आयजीएससीई, आयसीएसई, आयबी,एनआयओएस बोर्डाच्या विद्यार्थ्यासाठी समितीने प्रवेशाविषयी मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ एसएससी बोर्ड व्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सूचना देण्यात आली आहे. सीबीएसई बोर्ड विद्यार्थ्याच्या गुण पत्रिकेमध्ये श्रेणी ऐवजी यावर्षीपासून गुण दिलेले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांचे मुख्य पाच विषयाचे इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र व द्वितीय भाषा गुण प्राविण्य गुणांसाठी गृहीत धरले जातील. या व्यतिरिक्त असणाऱ्या विषयाचा प्राविण्य गुणांसाठी विचार केला नाही. 


आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे परीक्षा पत्र, ॲडमिट कार्ड, हॉल तिकिट बघून विषयाची खात्री करून त्यानुसार विषय गट तपाले जातील. विद्यार्थी गट १ व गट २ एकत्रित किंवा बेस्ट आफॅ फाईव्ह मधून गट -१ व गट -२ घेऊ शकतो अथवा तिन्ही गट एकत्रित करून संपूर्ण गुणांसह एकूण गुण ध्यानात घेतले जातील. विद्यार्थी इंग्रजी विषयासह ५ विषयांत उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 
एनआयओएस बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रिकेप्रमाणे सर्व विषयांसह एकत्रित गुणांप्रमाणे गुण भरावेत विज्ञान शाखा प्रवेशासाठी इयत्ता १० वीच्या परीक्षेत शास्त्र, विज्ञान विषय ३५ टक्केवारीसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एसवायसी (subject yet to be cleared) असा शेरा असणारा विद्यार्थी नियमित पास विद्यार्थ्यां सोबत अर्ज भरण्यास अपात्र आहे. सर्व विषयांत ३५ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रकावरील विषयांनुसार गुण एकत्रित करावेत. बेस्ट आफॅ फाईव्ह निवडता येणार नाही. 

 

आयजीएससीई , आयजी, आयबी परदेशातील विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रावरील विषयांनुसार सर्व विषयाचे गुण एकत्रित घ्यावेत. नंतर ते ५०० गुणांमध्ये रुपांतरीत केले जातील. बेस्ट आफॅ फाईव्हही निवडता येणार नाही. बोर्डाच्या मार्क्सशीट वरील विषयानुसार गुण एकत्रित करावेत बेस्ट ऑफ फाइव्ह निवडता येणार नाही. कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाव्यतिरिक्त शालेय पातळी वरील परीक्षा उत्तीर्ण असल्यास असे विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेसाठी अपात्र समजण्यात येईल. प्रोव्हिजनल मार्क्स शीट स्वीकारली जाईल. तसेच प्रवेश देखील प्रोव्हीजनल दिला जाईल. निकालानंतर असे प्रवेश अंतिम केले जातील. समकक्ष बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित सही शिक्का असणे आवश्यक असल्याचे सी.आर. राठोड, इयत्ता ११ वी केंद्रीय प्रवेश समिती, अमरावती तथा शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी कळविले आहे. 

बातम्या आणखी आहेत...