आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघ शिकार प्रकरणातील आरोपीस पकडण्यास गेलेल्या पथकावर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या वनपथकावर गावातील महिलांनी दगड-काठ्याने हल्ला करत आरोपीला पकडण्यास मज्जाव केला. या प्रकरणी अवैध शिकार प्रतिबंधक कक्षाच्या सहायक वनसंरक्षक गीता नन्नावरे यांनी तक्रार केली आहे.  शिकारप्रकरणी आरोपी देवीदास कुमरे, बाबूलाल कुमरे, सुनील उर्फ चुन्नु परसराम सयाम, हेमराज कुंजाम, मुकेश उईके, सुकल्या धुर्वे, भीमराव परतेती, निलकंठ कुडसाम, राजाराम काेडवते, मनराज इनवाते, विजय जानराव या आरोपींचा जामीन उच्चन्यायालयाने रद्द केला. या आरोपींविरूद्ध प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, रामटेक यांनी ७ आॅक्टोबरला गैरजमानती वाॅरंट जारी केला होता.  


पथक कोलीतमारा येथे गेले असता अारोपी मनराज दावजी इनवाते हा घरी लपून बसला होता. चंद्रकला ब्रिजलाल वरठी या त्याच्या घरातील महिलेने गावातील इतर महिलांना गोळा करून पथकाला आरोपीला पकडण्यापासून रोखले. तसेच त्याला पळून जाण्यास मदत केली. 
गावातील सुमारे ४० ते ५० महिलांनी दगड-वीटा व काठ्या घेऊन पथकाचा पाठलाग करीत शिवीगाळ केली. या महिलांनी पथकातील कर्मचाऱ्यांचे कपडे ओढले तसेच स्वत:च्या अंगावर राॅकेल ओतून घेत जाळून घेण्याची धमकी दिली. काही महिलांनी पथकातील जवानाच्या हातातील रायफल ओढून घेण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सर्व कर्मचारी परत जात असताना वाहनासमोर आडवे होऊन रस्ता अडवून धरला होता.

बातम्या आणखी आहेत...