आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडाऱ्यातील जिल्ह्यात तुमसरमध्ये गारपिटीमुळे 460 पोपटांनी गमावले प्राण; हजारो पक्षी जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारा- तुमसर शहरातील शिव मंदिराजवळ गारांसह अवकाळी पाऊस झाल्यामुळे 460 पोपटांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमसर शहरातील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर हजारो पोपटांचे वास्तव्य आहे.



लिंबाच्या आकाराएवढ्या गारांच्या माऱ्यामुळे झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले आहेत. त्यापैकी 460 पोपटांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व पोपटांचे मृतदेह वन विभागामार्फत जमिनीत पुरण्यात आले आहेत. इतक्या मोठया प्रमाणात पोपटांचे मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि वन्यजीव प्रेमींनी निराशा व्यक्त केली आहे.

 


गेल्या दोन दिवसात पूर्व आणि पश्चिम विदर्भात गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.  गोंदिया जिल्ह्यातील गोरगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. गोरेगाव तालुक्यातील कुराडी, खाडीपार, मुंडीपार, मंगेझरी या गावात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला असून अनेक ठिकाणी गारांचे थर जमा झाले. रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीमुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. शेतात पीक नसले तरीही बाहेर ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे. गारपिटीचा फटका जनावरे आणि परदेशी पक्ष्यांनाही बसला. अनेक पक्षी आणि जनावरे जखमी झाले आहेत.

 


या नुकसानाबाबत गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शेतात पाहणी करत तहसीलदारांना पंचनामा करुन लवकर नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा व्हिडीओ

बातम्या आणखी आहेत...