आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीच्या वादातून मोठ्या भावाचा भावाचा खून; भुसावळ येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मालमत्तेवरून झालेल्या वादात लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता भुसावळात घडली. खडका राेडवरील माेहंमदियानगरात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. संशयिताला  बाजारपेठ पाेलिसांनी अटक केली. जावेद अली गुलाम अली (३१) असे मृत भावाचे नाव आहे, तर संशयित लहान भावाचे नाव वाहेद अली गुलाम अली (२७) असे आहे.     


माेहंमदियानगरातील रहिवासी साबियाबी गुलाम अली यांच्या दोन्ही मुलांमध्ये मालमत्तेवरून वाद होता. पतीच्या निधनानंतर साबियाबी रेल्वेच्या सीएनडब्ल्यू विभागात नोकरीला लागल्या. गेल्या तीन वर्षांपासून मालमत्तेच्या कारणावरून त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये खटके उडत होते. त्यांचा मोठा मुलगा जावेद हा रेल्वेत अन्न पुरवण्याचे काम करत होता, तर लहान मुलगा वाहेद अली गुलाम अली रिक्षा चालवतो. साबियाबी मोठ्या मुलासोबत राहत असत, तर लहान मुलगा वाहेद वेगळा होता. गुरुवारी सकाळी जावेद भात तयार करत असताना दोन्ही भावांमध्ये पुन्हा वाद झाला. वादात वाहेद अली गुलाम अलीने माेठा भाऊ जावेद अलीवर २० इंच लांबीच्या धारदार चाकूने सात वार केले. त्यानंतर घरातील इतर लाेकांनी त्याला तातडीने  रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान  त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत गुन्हा दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...