आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटसरूंना थंडगार, चवदार ताकाचे मोफत वाटप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरात सातत्याने ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे सकाळी १० पासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागतात. अशात घराबाहेर पडलेल्यांचे घसे कोरडे पडतात. शरीर घामेजून थकते त्यामुळे काहीतरी थंड पेय घ्यावे अशी साहजिकच इच्छा होते. नेमकी हीच बाब हेरून उन्हाची दाहकता शमविण्यासाठी जे.पी.पी जैन महिला फाऊंडेशनद्वारे राजापेठ-अंबादेवी मार्गावरील ओसवाल भवनाच्या पुढे वाटसरूंना मोफत चवदार ताकाचे वाटप केले जात आहे. िदवसभरात १२०० ग्लास ताकाचे वाटप केले जाते, अशी माहिती फाउंडेशनद्वारे देण्यात आली. 

 

दूध आणून त्यापासून रात्री ४० लिटर दही बनविले जाते. या दह्यात साखर, मीठ मिसळून गार ताक बनवून हे ताजे ताक वाटसरूंना दररोज वितरित केले जात आहे. २९ मार्च रोजी महावीर जयंतीपासून ताक वाटपाला सुरुवात झाली असून ३१ मे पर्यंत हा उपक्रम चालणार आहे. २०१५ पासून फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चांडक यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम सुरू आहे. दुपारी १२ ते ५ या कालावधीत येथे उन्हामुळे थकलेल्या गरीब, श्रीमंत अशा सर्वांसाठीच पाणी व ताक वाटप केले जाते, अशी माहिती येथे ताक वाटण्यासाठी मानधनावर नियुक्त मनोरमा ढोक यांनी िदली. जे.पी.पी. जैन महिला फाऊंडेशनसोबतच या नीरपूर्ती वाटीकेसाठी पारख, लुनिया, चोपडा, शर्मा, सिंघवी, बरडिया आणि डाॅ. तापडिया परिवार संपूर्ण खर्च करत असतात.

 

२९ एप्रिलपासून वाटणार आंब्याचे पन्हे 
येत्या २९ एप्रिलपासून आंब्याच्या पन्हयाचे वाटप केले जाणार आहे. अक्षय तृतीयेच्या िदवशी उन्हाने कासावीस झालेल्या वाटसरूंना थंडावा मिळावा म्हणून दिवसभर ऊसाच्या रसाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर १९ एप्रिलला आंब्याचा रस वाटण्यात आला. त्यानंतर सातत्याने ताक वाटले जात आहे, अशी माहिती ताक वाटपाचे काम करणाऱ्या मनोरमा ढोक व अंजू मानकर यांनी दिली. 


 

बातम्या आणखी आहेत...