आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर मोदींची ‘कास्ट व्हॅलिडीटी’ तपासावी लागेल : नाना पटोले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मणिशंकरअय्यर यांच्या ‘नीच’ शब्दावरून वादळ उठले. अय्यर यांच्या शब्दाचे मी कदापि समर्थन करणार नाही. पण मोदींनी त्याचे भावनिक भांडवल करीत राजकारण केले. मोदी स्वत: ओबीसी असल्याचे सांगतात. पण आता त्यांचीही कास्ट व्हॅलिडीटी आहे की नाही, हे पाहावे लागेल. गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत प्रचारात मोदींचा खोटारडेपणा उघडकीस आणीन, असे विदर्भातील ओबीसींचे नेते म्हणून ओळखले जाणारे नाना पटोले यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 


ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. केंद्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय हवे, अशी मागणी मी केली. त्यावेळी मोदींनी ‘आपले खर्च कपातीचे धोरण असताना तुम्ही वाढवण्याच्या गोष्टी करता’ असे म्हणत गप्प बसवले. 


गोपीनाथ मुंडे असते तर राजीनामा देण्याची वेळ आली नसती. मुंडे आणि गडकरींमुळेच मी भाजपात आलो. मुंडे साहेबांनी मला काही आश्वासने दिली होती. ते असते तर त्यांनीच यातून काहीतरी मार्ग नक्की काढला असता, असेही ते म्हणाले. 


भाजपात अस्पृश झालो होतो
मोदींना प्रति प्रश्न विचारणारा वा त्यांच्या विरोधात बोलणारा भाजपात अस्पृश ठरतो. मोदी यांच्या घरी आयोजित बैठकीत मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर त्यांनी माझा पाणउतारा केला. भाजपात मी अस्पृश्य झालो होतो. 


मोदींनी केली मनाई
भाजपा नेहमीच वेगळ्या विदर्भाची समर्थक राहिली. जाहीरनाम्यातही त्यांनी विदर्भाविषयीचा उल्लेख केला. पक्षाची भूमिका अहल्यामुळे लोकसभेत वेगळ्या विदर्भाचे विधेयक मांडले. त्यावेळेस ‘ये तुमको किसने बताया’ म्हणून मोदींनी सुनावले. विधेयक मांडण्यासाठी मोदींपासून अनेक नेत्यांचा दबाव होता. आता हा दबाव नसला तरी जनतेची मते जाणून घेतल्यानंतर निर्णय घेऊ, असे पटोले म्हणाले. 


प्रसंगी स्वतंत्र पक्षाचा विचार करीन 
११डिसेंबरला अहमदाबाद येथे काँग्रेसच्या व्यासपीठावरून मोदींविरूद्ध प्रचार करणार आहे. ११ आणि १२ असे दोन दिवस तेथे प्रचार करीन. काँग्रेसच्या व्यासपीठावरून प्रचार करीत अाहो म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश करीन असा अजिबात नाही. कोठे जायचे याचा अजून निर्णय झालेला नाही. प्रसंगी स्वत: चा पक्ष काढण्याचाही विचार करू शकतो, असे पटोले यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...