आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेडरुममध्ये कपडे बदलत होती महिला, तेवढ्यात भिंतीवर लक्ष गेले आणि दिसला छुपा कॅमेरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो.... - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो....

अमरावती- शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या परिसरात एका घरात महिलेच्या बेडरुमच्या भिंतीला छिद्र करून चक्क सीसीटीव्ही कॅमेरा बसवला असल्याची धक्कादायक बाब सोमवारी (दि. २३) रात्री अकरा वाजताच्या सुमारास महिलेच्याच लक्षात आली. या प्रकरणी महीलेने तत्काळ शहर कोतवाली पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 


सदर महिलेच्या घराला लागून एका मॉलचे बांधकाम सुरू होणार आहे. या बांधकामाची तयारी म्हणून काही मजूर त्या ठिकाणी कार्यरत आहे. दरम्यान सोमवारी रात्री सदर महिला तिच्या बेडरुममध्ये आली व कपडे बदलत होती. त्याच दरम्यान महिलेचे लक्ष भिंतीवर गेले. यावेळी भितींला छिद्र करून त्यामध्ये काळसर रंगाची एक वस्तू चमकत असल्याचे लक्षात आले. याबाबत महिलेने तिच्या पतीला व मुलाला सांगितले. ते तातडीने बेडरुममध्ये आले व त्यांनी बारकाईने पाहले असता तो कॅमेरा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तो बाहेर ओढला तर जवळपास चार ते पाच इंच वायरसह कॅमेरा बाहेर आला.

 

दरम्यान, याचे काही छायाचित्र महिलेच्या मुलाने घेतले. महिला व तिच्या पतीने कोतवाली पोलिसांत तक्रार दिली. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत तो कॅमेरा त्या ठिकाणाहून काढून घेण्यात आला होता. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी विनयभंग तसेच माहिती व तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...