आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर अधिवेशनाचा फार्स बंद करा; भाजपचे आमदार आशिष देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भाला न्याय मिळावा, या भागाचे प्रश्न सुटावेत यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन नागपुरात सुरू करण्यात आले. परंतु दहा-बारा दिवसांच्या कामकाजातून विदर्भाला न्याय मिळू शकत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चालू अधिवेशन किमान ६ आठवडे घेऊन नागपूर कराराचा सन्मान करावा, अन्यथा नागपूर अधिवेशनाचा वार्षिक फार्स बंद करून टाकावा, अशी मागणी भाजपचे काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे. भाजपवर नाराज असलेल्या डॉ. आशिष देशमुख यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.    


विदर्भ महाराष्ट्रात विलीन होण्यापूर्वी नागपूर ही मध्य प्रांत व वऱ्हाडाची राजधानी होती. राजधानी मुंबई होणार असल्यामुळे इकडचे प्रश्न सोडवण्यात अडचणी येतील हे ओळखून तत्कालीन नेत्यांनी नागपूर करार केला. अधिवेशनाच्या आधी आणि नंतरही किमान एक-दोन आठवडे सरकारने येथे राहावे, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात गेली कित्येक वर्षे १०-१५ दिवसांचे कामकाज होते आणि सरकार मुंबईला परत जाते. त्यामुळे विदर्भाचे प्रश्न सुटत नाहीत. नागपूर कराराचा सन्मान म्हणून विदर्भाच्या विकासासाठी भाजपची प्रतिबद्धता सिद्ध करण्यासाठी आणि या प्रदेशाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे अधिवेशन किमान सहा आठवडे चालावे, अशी अपेक्षा आहे. ते होणार नसेल तर हा वार्षिक उपचार किंवा तमाशा बंद केलेला बरा, असे मत आशिष देशमुख यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...