आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीबीएसच्या सुधारित जागांना सशर्त मान्यता; मेडिकल काऊन्सीलच्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- उच्च न्यायालयाने दणका दिल्याच्या पार्श्वभूमीवर मेडिकल काऊन्सील ऑफ इंडियाने विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस च्या सुधारित जागांना सशर्त मान्यता दिली आहे. महाविद्यालयांमधील त्रुटी महिनाभरात दूर करण्याच्या अटींवर ही मान्यता देण्यात आली आहे. 


दोन महिन्यांपूर्वी भारतीय मेडिकल काऊन्सीलच्या कार्यकारी परिषदेने नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच अकोला येथील शासकीय महाविद्यालयांमधील सुविधांमधील त्रुटींवर बोट ठेवत एमबीबीएसच्या प्रत्येकी ५० जागा कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यावर न्यायालयाने एप्रिल महिन्यातील आपल्या आदेशात मेडिकल काऊन्सीलच्या कारभारावर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. 


विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांबाबत काऊन्सीलचा दृष्टीकोन अतिशय नकारात्मक राहिलेला असून कुठल्याही परिस्थितीत विदर्भातील वैद्यकीयच्या जागा कमी होेऊ नये, अशी तंबीही न्यायालयाने दिली होती. आदेशाचे पालन न झाल्यास अवमान प्रक्रिया राबवण्याचा इशाराही दिला होता. हा वाद नंतर सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने अवमान प्रक्रियेला स्थगिती देताना मेडिकल काऊन्सीलची बाजू योग्य असल्याचे नमूद करताना राज्य सरकारला महाविद्यालयांमधील त्रुुटी दूर करण्यासंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. घडामोडींचा एकत्रित परिणाम म्हणून काऊन्सीलने महिनाभरात त्रुटी दूर करण्याच्या वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या हमीवर सुधारित जागांना मंजुरी दिली. २०१३ मध्ये या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा १०० वरून १५० पर्यंत वाढविण्यात आल्या होत्या, हे विशेष. विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना १०० जागा भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...