आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने ‘मीरा’चे होऊ शकले नाही अवयव दान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तान्हुल्या मीरा सोबत डॉ सावरकर दांपत्य. - Divya Marathi
तान्हुल्या मीरा सोबत डॉ सावरकर दांपत्य.

अमरावती- शहरातील मीरा सावरकर या तीन महिन्याच्या तान्हुलीचे अवयव दान करण्याची इच्छा असणाऱ्या डॉ. सावरकर दाम्पत्याला राज्यात वेळीच बालकांचे अवयव दान करण्यासाठी प्रमाणित करणारे अधिकृत तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे आपल्या तान्हुलीचे अवयव दान करता आले नाही. कुणाचे तरी प्राण वाचावे म्हणून एकीकडे अवयव दान करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असली तरी बालकांचे अवयव दान करण्यासाठी प्रमाणित करणारे तज्ज्ञ राज्यातच नसल्याची बाब आता या निमीत्ताने समोर आली आहे. 


प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उमेश सावरकर, त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी तीन महिन्यांची तान्हुली मीरा डिसेंबरला रात्री बारा वाजताच्या सुमारास एका कार्यक्रमातून कारने घरासमोर पोहोचले होते. त्यावेळी चालक घराचा दरवाजा उघडण्यासाठी खाली उतरला आणि डॉ. उमेश, त्यांच्या पत्नी मीरा कारमध्ये बसून होते. त्याचवेळी मीराचा काळ बनून भरधाव वेगाने आलेली कार डाॅ. सावरकर यांच्या कारवर धडकली. या धडकेत मीराला जबर दुखापत झाली. तीला उपचारासाठी तातडीने नागपूरला घेवून जाण्यात आले. उपचार सुरू असताना डिसेंबरला दुपारच्या सुमारास तान्हुल्या मीराचा ‘ब्रेनडेड’असल्याची बाब उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी डॉ. सावरकर यांना सांगितली. पोटचा गोळा गेल्याचे दुख: असतानाही डॉ. सावरकर दाम्पत्याने आपल्या चिमुकलीचे अवयव दान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. उर्वरित.पान 


धडक देणाऱ्या कारची गती होती ताशी ८० वर

डॉ.सावरकर यांच्या कारला धडक देणाऱ्या कारची गती किमान प्रतितास ८० पेक्षा अधिक असावी, कारण सद्या या कारचे गती दर्शक मीटर ८० वर लॉक झाले. याचाच अर्थ ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कारची गती निश्चितच यापेक्षा अधिक होती. या कारने धडक दिल्यानेे डॉ. सावरकर यांची उभी कार पाच फुटवरील झाडावर आदळली. शहरातून कारची ही जीवघेणी गती, यातही रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या कारला धडक देण्यात आली. यावरून कार चालक किती मस्तवालपणे कार चालवत होता, याची प्रचिती येते. 


अपघात प्रकरणात पहिल्यांदाच दाखल झाला ‘३०४’
अपघातातधडक देणाऱ्या, अपघातास कारणीभुत चालकाविरुद्ध ‘३०४ (अ)’ या कलमान्वये गुन्हा दाखल झाला. मात्र यात फ्रेजरपुरा पोलिसांनी कारचालकाविरुध्द ३०४ हे कलम लावले. यापुर्वी अपघातात लावले नाही. २५ जानेवारी २०१२ ला पुण्यात संतोष माने या चालकाने अपघात घडवला होता. त्यात जणांना मृत्यू झाला होता. त्यात पोलिसांनी ‘३०४’ कलम वापरले होते. कदाचित त्यानंतर हे पहिलेच प्रकरण असावे, ज्यात चालकाविरुद्ध ‘३०४’ लावल्याची शक्यता ठाणेदार आसाराम चोरमले यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...