आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काऱ्यास गावजेवणाची 'शिक्षा'; जातपंचायतीच्या सहा जणांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात न देता त्याला केवळ गावजेवण घालण्याची विचित्र शिक्षा सुनावणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील जात पंचायतीतील सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.    

 

आदिवासींच्या कल्याणासाठी कार्यरत भूमकाल संघटनेने हे प्रकरण उजेडात आणले होते. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील मोहली येथे हा प्रकार घडला. अनिल मडावी या चाळीस वर्षीय व्यक्तीवर  पाच वर्षे वयाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. जात पंचायतीने पोलिसांकडे तक्रार न करता मडावी याला पीडितेच्या कुटुंबाला १२ हजार रुपयांची मदत व गावजेवण देण्याची शिक्षा ठोठावली. या विचित्र निर्णयाची भूमकाल संघटनेने गंभीर दखल घेऊन धानोरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याशिवाय अनेक सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करत जात पंचायतीवर कारवाईची मागणी केली होती. धानोरा पोलिसांनी याप्रकरणी मोहली गावातील कथित जात पंचायतीचे सदस्य रोहिदास पदा, देवराव पदा,  खुशाल पदा, गजानन मडावी, सखाराम हिचामी व यादव हुर्रा यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. या सहा आरोपींना गडचिरोली न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका झाली.

बातम्या आणखी आहेत...