आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दर्यापूर- अकाेला जिल्ह्यातील रहिवासी व खोलापूरलगतच्या नावेड येथील सासुरवाडी असलेल्या एका ३३ वर्षीय युवकाने शहरातील जयस्तंभ चौकातील सेंट्रल बँकेसमोरील खुल्या जागेत असलेल्या टिनाच्या शेडला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.२३) रात्री १०.३० च्या सुमारास उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विकास बाळकृष्ण तायडे ( रा. कौलखेड जहागीर ता.जि.अकोला) असे मृतकाचे नाव आहेे. घटनास्थळी दुचाकी (क्रमांक एमएच ३०-एके-६२७७) बेवारस स्थितीत पडलेली होती.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक नंदलाल लिगोंट व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून विकासचा मृतदेह उपजिल्हा रुगणालयात पाठवला. विकास तायडे अंजनगाव तालुक्यातील कोर्कंडा येथे सांक्षगधाचा कार्यक्रम आटोपून खोलापूरलगतच्या नावेड गावात सासरी गेला होता.
पान खाऊन येतो म्हणून घराबाहेर पडला व दर्यापुरात येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिस उपनिरीक्षक नंदलाल लिंगोट यांनी दिली.मृतक हे विवाहित असून,आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.