आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झाडगांव येथे तीन मुलींना डेंग्यूची लागण, बालिकेचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव रेल्वे- तालुक्यातील झाडगाव येथे तीन मुलींना डेंग्यूची लागण झाली असून, तनु योगेश वासाडे (वय ११) या बालिकेचा बुधवारी मृत्यू झाला. रेशमा खुशाल मोरे (वय ११), सोनू सुधाकर टेम्भुरकार (वय ११) यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


तालुक्यतील झाडगांव येथे गावातील पाण्याची पाईलाईन गटारामधून गेली असून, व्हॉल्व्हसुद्धा दूषित पाण्याने भरले आहेत. दुसरीकडे ठिकठिकाणी डबके साचल्याने गावात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. दरम्यान दोन आठवड्यापूर्वी गावातील तनु वासाडे, रेशमा मोरे, व सोनू टेम्भुरकार या तिघींना ताप आला. त्यामुळे त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातच उपचारादरम्यान तनु वासाडेचा बुधवारी मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. डेंग्यूची लागण झालेल्या उर्वरित दोन मुलींवर उपचार सुरू असल्याचेही रुग्णालयाच्या सुत्राने सांगितले. गावात आतापर्यंत डेंग्यूचे पाच संशयीत रुग्ण आढळून आले चार जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाच्या यंत्रणेणे ही बाब अद्याप गांर्भीयाने घेतलेली नाही. निंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रास याबाबत मौखिक तक्रार देऊनही कुठलीच कारवाई झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...