आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाध्यक्ष; मराठवाड्याच्या साहित्यिकाला सन्मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बडोदा येथे होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूमचे मूळ रहिवासी साहित्यिक आणि माजी सनदी अधिकारी डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख (६३) निवडून आले. कथा-कादंबरीकार डाॅ. रवींद्र शोभणे दुसऱ्या स्थानी राहिले. विजयासाठी ४ फेऱ्यांत ४३४ मतांचा कोटा आवश्यक होता. मात्र चौथ्या फेरीअखेर एकाही उमेदवाराने कोटा पूर्ण केला नाही. यामुळे देशमुख यांना विजयी घाेषित करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी अॅड. मकरंद अग्निहोत्री यांनी दिली.  


साहित्यसंपदा

सध्या पुण्यात स्थायिक असलेले माजी आयएएस अधिकारी देशमुख यांनी कादंबरी, कथा, नाटक, बालनाट्य, ललितेतर, संपादने तसेच इंग्रजी व हिंदीतही लेखन केले. त्यांनी सलोमी, ऑक्टोपस, अंधेरनगरी, हरवलेले बालपण, अग्निपथ, मृगतृष्णा आदी २६ पुस्तकांचे लेखन केले. 

 

मराठीच्या सेवेसाठी प्रसंगी सरकारविराेधातही जाऊ
मी पिंडाने लेखक. प्रशासन क्षेत्रात सनदी अधिकारी होतो. पण मी ‘कार्यकर्ता अध्यक्ष’ म्हणूनच काम करेन. तसेच बारावीपर्यंतच्या शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी पाठपुरावा करणार अाहे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रसंगी सरकारविरोधी भूमिका घ्यावी लागली तर त्याचीही तयारी आहे.
- लक्ष्मीकांत देशमुख, संमेलनाध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...