आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या प्रश्नांवर ग्रामविकासमंत्री मुंडे भांबावल्या; भाजप विरोधात असतानाच्‍या मागणीची आठवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सत्ताधारी पक्षात राहूनही मंत्रिपदापासून दूर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते सध्या पक्षावर किंवा पक्षनेत्यांवर टीका करायला मागेपुढे पाहत नाहीत. याचा प्रत्यय गुरुवारी विधानसभेतही पाहायला मिळाला. त्यांनी एकापाठोपाठ एक प्रश्न करून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भंबेरी उडवून टाकली. भाजप विरोधी पक्षात असताना लावून धरलेल्या मागणीची त्यांनी सत्ताधाऱ्यांना आठवून करून दिली. मात्र, त्याचे उत्तर देताना पंकजा मुंडे चांगल्याच अडचणीत आल्याचे दिसले. प्रश्नोत्तराच्या तासात रोजगार हमी योजनेचा मुद्दा चर्चेत आला. 


त्या वेळी खडसे म्हणाले, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेत समाविष्ट करून घ्यावे, ही मागणी विरोधी पक्षात असताना भाजपनेच लावून धरली होती.  शेतमजुरांना रोजगार हमी योजनेत का समाविष्ट केले जात नाही, याकडे खडसे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधले.  मात्र, आपल्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने विचारलेल्या या प्रश्नावर पंकजा मुंडे भांबावल्या. त्यावर शेतमजूर हे केंद्राच्या रोजगार हमी योजनेच्या निकषात बसत नसल्याचे स्पष्टीकरण मुंडे यांनी दिले. मात्र, खडसेंनी पंकजा मुंडे यांना कोंडीत पकडत रोजगार हमी योजनेचा केंद्र सरकारशी काहीच संबंध येत नसल्याचा युक्तिवाद केला. 


आपण विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही, मी व स्वतः देवेंद्र फडणवीस या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले होत. शेतात होणाऱ्या मजुरांच्या कामाला रोहयोच्या कामात समाविष्ट करावे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी मागणी करत होतो, याची आठवण खडसेंनी मुंडे यांना करून दिली. त्यामुळे या मुद्यावर तत्काळ निर्णय होण्याची आवश्यकता आहे. आता निर्णय घेऊन टाका, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली.

 

खडसेंच्या प्रश्नावेळी मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती
एकनाथ खडसे यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्यापुढे अडचण  निर्माण झाली होती. रोजगार हमी योजनेत शेतमजूरांचा समावेश करण्याची सूचना चांगली आहे. मात्र, आता राज्याची रोहयो राहिली नसून केंद्र सरकारच्या मनरेगामध्ये ही योजना समाविष्ट झाल्याचे सांगून पंकजा मुंडे यांनी स्वतःची सुटका करून घेतली. या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित नव्हते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...