आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडस्ट्रीज मालकाची नोकराने केली हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- लग्नासाठी मागितलेले पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या नोकर विश्वास रामुजी शेषकार (वय ५०) रा. राजना पूर्णा याने एमआयडीसीतील राजेंद्र ऑइल इंडस्ट्रीजचे मालक ठाकूरदास धुलारामजी करेसिया (वय ७६) यांची हत्या केली. ही घटना रविवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


ठाकूरदास करेसिया यांची एमआयडीसी परिसरात प्लाॅट क्रमांक ३१-बी येथे राजेंद्र ऑइल इंडस्ट्री आहे. करेसिया यांच्याकडे पूर्वी विश्वास शेषकार कामावर होता. काही दिवसांपासून विश्वासने ठाकुरदास यांना लग्नाला जाण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु ठाकुरदास यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या विश्वासने रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ठाकूरदास यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात ठाकूरदास यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ठाकूरदास यांचा मुलगा नरेंद्र करेसिया रा. वृंदावन कॉलनी, साईनगर यांच्या तक्रारीवरून सोमवारी विश्वास शेषकार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...