आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी यादीत नाव आले नाही, शेतकऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी- कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने निराशेतून शेतकऱ्याच्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना वडवणीत सोमवारी पहाटे घडली. मुक्ता मधुकर उजगरे उजगरे असे आत्महत्या केलेल्या महिला शेतकऱ्याचे नाव आहे. वडवणी पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


राज्यात शेतकऱ्यांना सरकारने दीड लाखापर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या पात्र यादीत नाव आलेले नाही. यामुळे आता निराशेतून पुन्हा शेतकरी आत्महत्येकडे वळले आहेत. वडवणी शहरातील मधुकर उजगरे यांना पाच एकर कोरडवाहू शेती अाहे. त्यांनी स्टेट बँक आॅफ इंडियाचे ५७ हजारांचे कर्ज घेतले होते. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर आपले कर्ज माफ होईल अशी त्यांना आशा होती मात्र, कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने त्यांची निराशा झाली. 


मधुकर व त्यांचे कुटुंबीय कर्ज परतफेडीच्या विवंचनेत होते. यातूनच सोमवारी पहाटे त्यांच्या पत्नी मुक्ता यांनी घरातच पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. वडवणी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

बातम्या आणखी आहेत...