आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गडचिरोली लवकर नक्षल मुक्त व्हावे, शहीद पोलिस कुटुंबीय आणि पीडितांच्या भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई करून ३९ नक्षलवाद्यांना ठार केल्याचा कारवाईचे जोरदार समर्थन करताना या कारवाईचा आम्हाला अभिमान असून गडचिरोली जिल्ह्य नक्षल मुक्त होणे आमचे स्वप्न असल्याची भावना शाहिद पोलिस कर्मचाऱ्यांनी कुटुंब व नक्षल पीडितांच्या संघटनेने नागपुरात बोलताना व्यक्त केली. गडचिरोली चे सी६० पथक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या संयुक्त कारवाईत प्रथमच मोठ्या संख्येने नक्षलवादी ठार झाले. 


ही अतिशय धाडसी कारवाई होती असे सांगताना संघटनेच्या अध्यक्ष हेमलता वाघाडे म्हणाल्या की, भ्याड नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आजवर शहीद पोलिस आणि सामान्य निष्पाप नागरिकांना ही श्रद्धांजली च आहे. नक्षलवाद्यांना गरीब आदिवासींची चिंता नाही. त्याचा केवळ राजकीय अजेंडा आहे. गडचिरोलीतील विकास , आदिवासींच्या शिक्षणात नक्षलवादी कायम बाधा बनत आले आहेत. पोलिसांचे खबरे ठरवून दलित, आदिवासी बांधवाना गोळ्या घालण्याचे काम आजवर नक्षलवाद्यांनी केले. मात्र आता परिस्थिती बदलते आहे. नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळेनासा झाला आहे. लवकरात लवकर गडचिरोली नक्षलमुक्त व्हावा आणि या भागात विकास पोहोचावा, हे आमचे स्वप्न आहे, असेही वाघाडे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...