आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात अल्पवयीन प्रेमी युगलाने दिला जीव, शेवटच्या श्वासपर्यंत होते राहिले एकत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जंगलात पडलेला प्रेमी युगलाचा मृतदेह. - Divya Marathi
जंगलात पडलेला प्रेमी युगलाचा मृतदेह.

नागपूर- गोंदिया जिल्ह्यात तिरोडा तालुक्यातील बोदलकसा गावातील 12 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि 10 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने विष घेऊन आत्महत्या केली. दोघेही बुधवारी घरातून शाळेत जात असल्याचे सांगत बाहेर पडले होते. दुपारी जंगलात काही लोकांना त्यांचे मृतदेह दिसले. त्यांच्या शेजारीच विषाचे पाकीट पडले होते. 

 

 

काय आहे पुर्ण प्रकरण
- बोदलकसा गावात राहणाऱ्या अमन राहगडाले (वय 17) हा 12 वीत शिकत होता. त्याचे गावातच दहावीत शिकणाऱ्या वैशाली भरम (वय 16) हिच्यावर प्रेम होते. ते दोघे एकत्र फिरत असताना त्यांना वैशालीच्या भावाने पाहिले. बुधवारी सकाळी वैशाली शाळेत जाण्यासाठी निघाली पण शाळेत पोहचलीच नाही. अमनही घराबाहेर पडला पण शाळेत पोहचलाच नाही. ते जंगलात गेले आणि त्यांनी विष घेत आत्महत्या केली. त्यांचे मृतदेह जंगलातच पडले होते.
- जंगलातून जाणाऱ्या काही लोकांना त्यांचे मृतदेह दिसले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पाहणी केली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

 

 

भावाच्या भीतीने आत्महत्या केल्याचा संशय
- वैशालीच्या भावाने या दोघांना एकत्र फिरताना पाहिले होते. वैशाली आणि अमनने वैशालीच्या भावाच्या भीतीने आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांनी आत्महत्या आणि खून या दोन्ही अॅंगलने तपास सुरु केला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...