आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसोबत भांडण झाल्याने घराबाहेर पडली मुलगी, नराधमांनी दोन दिवस केला सामुहिक बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात राहणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीचे आईसोबत भांडण झाले व ती घराबाहेर पडली. तिला एकटी पाहून चौघांनी तिच्यावर दोन दिवस सामुहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन चारही आरोपींना अटक केली असून त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांना 28 मे   पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेन्द्र बाजीराव महाजन (३१), शुभम ऊर्फ बबलू श्रीकृष्ण मेश्राम (२८) आणि अक्षय किशोर मेश्राम (२७, तिघेही रा. महादेवखोरी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील पिडीत चौदा वर्षीय मुलीचे आईसोबत भांडण झाले असल्यामुळे ती १७ मे रोजी रात्री घरी गेली नाही. दरम्यान १८ मे रोजी सकाळी अंबादेवी मंदीरात गेली, दिवसभर मंदीरात थांबली व रात्री पुन्हा महादेवखोरी भागात गेली. त्या रात्रीही ती घराबाहेरच झापेली. दरम्यान १९ मे रोजी सांयकाळी महादेव खोरी भागातील पुलाजवळ तिला नरेन्द्र महाजन भेटला, कुठे जात आहे, असे विचारले असता तिने आईसोबत भांडण झाले व घरी जायची भिती वाटत आहे असे त्याला सांगितले. 

 

यावेळी त्याने सहानुभूती देवून तिला स्वत:च्या घरी आणले. त्यादिवशी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्याने घरातच तिच्यावर अतिप्रसंग केला व त्याच ठिकाणी तिला डांबून ठेवले. आईसोबत भांडण केले असल्यामुळे या प्रकाराची कुठेही वाच्यता युवतीने केली नाही. असे तक्रारदार युवतीने तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान २१ मे रोजी ही युवती कशीबशी नरेन्द्रच्या घरातून बाहेर निघाली. त्याचवेळी भिमटेकडी येथे जात असताना अक्षय भेटला, त्याला पिडीतेने नरेन्द्रने केलेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. त्यावेळी अक्षयने तिला सहानुभूती देवून जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आणले व त्यानंतर त्याच्या विक्की नामक मित्राकडे नेले. त्याठिकाणी अक्षय, शुभम व एका अल्पवयीनाने आळीपाळीने सामुहिक अत्याचार केल्याचा आरोप युवतीने केला आहे. या प्रकरणी युवतीने तिच्या आईला सांगितले. दुसरीकडे आईने मुलीचा शोध सुरूच ठेवला होता. १७ मे रोजी मुलगी हरविल्याची तक्रारही तीच्या आईने पोलिसात दिली होती. दरम्यान हा प्रकार मुलीने सांगितल्यानंतर तिची आई बुधवारी सांयकाळी तीला घेवून फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात पोहचली. पोलिसांना तिने तक्रार देताच पोलिसांनी चौघांविरुध्द सामुहीक बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान चौघांना बुधवारी रात्रीच पकडले मात्र एक अल्वपयीन असल्यामुळे तो वगळता इतर तिघांना अटक केली. त्या तिघांना गुरूवारी (दि. २४) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...