आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरखेडला आढळला एका महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या मृतदेहाने ब‌ळावला खुनाचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरखेड- येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या निंभी-इनापूर मार्गावरील पुलाखाली अर्धवट अवस्थेत जळालेल्या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना गुरुवारी (दि. २६) सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी याबाबत शिरखेड पोलिसांना माहिती दिली. 


सकाळी परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना पुलाच्या बाजूने दोन मानवी पाय वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. त्यांनी शोध घेतला असता, पुलाखाली अर्धवट अवस्थेत जळालेला महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत शिरखेड पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शोध घेतला असता, २० फुटांवर शेताच्या धुऱ्यावर रक्ताचे शिंतोडे आढळून आले. 

 

एकंदरीत परिस्थिती पाहता घटना एक दोन दिवसांपूर्वी घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. मृतक महिलेच्या दोन्ही पायात चांदीच्या तोरड्या, बोटात जोडवे, दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर नेलपॉलिश, हातात बांगड्या, एक चप्पल, तेलाच्या डबकीचे झाकण, जळालेली सिगारेट आढळून आले. श्वान पथकाला पाचारण केले असता, ते निंंभी-अमरावती मार्गावरील पुलापर्यंत आले. महिलेचा खून करून नंतर तिला जाळले असल्याचा अंदाज पाेलिसांनी वर्तवला आहे. वृत्त लिहिस्तोवर महिलेची ओळख पटली नव्हती. घटनेचा तपास ठाणेदार नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हेमंत चौधरी, किशोर भुजाडे, जमादार फुटाणे, किरण लकडे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ डी. बी. तळवी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनास्थळावर जाऊन प्राथमिक तपास पूर्ण केला असून, मृतक अज्ञात महिला कोण, तिचे मारेकरी कोण याबाबत तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार चव्हाण यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...