आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माओवाद्यांना हाकलण्यासाठी आदिवासी बांधवांना मदत करा; वंशविनाश वाचवण्याकरता आर्त हाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बोरिया व राजाराम खांदलाच्या जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी ३९ नक्षल्यांना ठार केले . या घटनेची चौकशीसाठी गेलेल्या मानवाधिकार सत्यशोधन समितीला नक्षल पीडितांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. अनपेक्षित विरोध , नक्षल पीडितांच्या प्रश्नांच्या सरबत्तीसमोर सत्यशोधन समिती सदस्यांना निरुत्तर हाेऊन निघून जावे लागले. दरम्यान गोंडवाना आदिवासी विकास संघटनेने पोस्टर्स लावून नक्षल्यांविरूद्ध जागृती सुरू केली. 


सत्यशोधन समिती आली त्यावेळी नक्षल पीडित संघटनेने सत्यशोधन समितीला धारेवर धरले होते. संघटनेने बॅनर लावून समितीचा निषेध केला होता. नक्षल्यांनी पोलिस खबऱ्या ठरवून मारलेल्या आदिवासींच्या कुटुंबीयांनी निषेधाचे फलक घेऊन नारेबाजी केली होती. या घटनेनंतर आदिवासी नक्षल्यांचा विरोधासाठी स्वत:हून पुढे येत आहे. नक्षल्यांनी झाड तोडून रस्ता बंद केल्यास झाड हटवून रस्ता मोकळा करणे, नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळणे, नक्षल्यांची समाधी उद्ध्वस्त करणे आदी गोष्टी लोक करीत असल्याने जनाधार गमावत चाललेले नक्षली बॅकफूटवर गेले आहे. 


वंशविनाश वाचवण्याकरता आर्त हाक
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाज मोठा आहे. त्यात नक्षल्यांकडून टारगेट करण्यात येत असल्याने आदिवासींत रोष आहे. आदिवासींचा वंशविनाश नक्षलवादी करु पाहत आहेत की काय, अशी भीती समाजाला वाटते आहे. ती दूर करून नक्षल्यांच्या विरोधासाठी गोंडवाना आदिवासी विकास संघटनेने पुढाकार घेतला असून, पानटपरी, बस स्टॉप, ग्रामपंचायत, शाळा भिंतीवर पोस्टर, स्टिकर लावून भावना व्यक्त करीत आहेत. आदिवासीत भीती निर्माण करून समाजाला बेघर करणाऱ्या खूनी माओवाद्यांना हाकलण्यासाठी मदत करा, असे आवाहन गोंडवाना आदिवासी विकास संघटनेने केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...