आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावाती: घराच्या जागेचा वाद; चौघांनी घेतले जाळून; दोघी बहिणी गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा- वडिलांनी बक्षीसपत्र करून दिलेल्या घराच्या जागेवरून दोन बहिणींमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान आई, दोन मुली व नातवाने जाळून घेण्यात झाले. ही घटना गुरुवार, दि. १७मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कसबेगव्हाण येथे घडली. या घटनेत आई शशिकला वासुदेव कोरडे (६५), शीला विलास सदार (४५) मंदा दीपक देशमुख (४५) व कुलदीप विलास सदार (१८) अशी जळालेल्यांची नावे आहेत. 


शीला व मंदा या दोघींचेही विवाह झाले असून त्या आईवडिलांसोबत कसबेगव्हाण येथे राहत होत्या. वयाेवृद्ध वडील वासुदेव कोरडे यांनी घराचे बक्षीसपत्र करून शीला व मंदा या दोन मुलींना दिले. मात्र या दोघींमध्येही जागेच्या कारणावरून वाद होता. गुरुवारीदेखील दोघींमध्ये जागेच्या कारणातून वाद झाला. नेहमीच्या वादाला कंटाळून शीलाचा मुलगा कुलदीप याने घरातून कॅन आणून अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. रागाच्या भरात दोन बहिणी शीला व मंदा तसेच त्यांच्या आईनेही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये शीला व मंदा ९० टक्के, तर शशीकला ४५ व कुलदीप हा ४० टक्के भाजला. जखमींना तत्काळ अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्याची माहिती बीट जमादार प्रमोद इचे यांनी दिली. वृत्तलिहस्तोवर चौघांवरही उपचार सुरू होते. संपत्तीच्या क्षुल्लक वादातून झालेल्या या जळीत प्रकरणाकडे पाहण्याची दुर्दैवी वेळ वासुदेव कोरडे यांच्यावर आली. तपास रहिमापूर पोलिस ठाणेदार एस. के. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूआहे. 

बातम्या आणखी आहेत...