आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनासाठी दीड हजार विद्यार्थी येणार स्वखर्चाने; संमेलनाध्यक्षही घेणार नाहीत प्रवासाचा खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बडोदा येथे मराठी वाङ््मय परिषदेतर्फे आयोजित मराठी साहित्य संमेलन साधेपणाने होणार आहे. याचा अर्थ नको तिथे काटकसर करण्यात येईल, असा अजिबात नाही, असे सांगतानाच साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हेही स्वखर्चाने संमेलनाला येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांनी दिली.  


यापूर्वीची सर्व संमेलने खर्चिक झाली. त्यातील थाटमाट डोळे दिपवणारा होता. श्रीमंती थाटाच्या या संमेलनात भरमसाट खर्च करण्यात आला. बडोदे येथील संमेलनाचे बजेटही दोन कोटींचे आहे. आम्ही नेमका तिथेच पैसा खर्च करणार आहोत. संमेलन विद्यापीठ मैदानावर होणार आहे. विद्यापीठाची उपलब्ध सगळी साधनसामग्री आम्ही वापरणार असल्याने अर्धा खर्च वाचणार आहे. राज्यातील महाविद्यालयांनी त्यांचे विद्यार्थी स्वखर्चाने स्वयंसेवक म्हणून पाठवण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत बाराशे-तेराशे विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे, असे खोपकर यांनी सांगितले.  


कार्यक्रमातील निमंत्रितांना प्रवासखर्च  संमेलनात आयोजित चर्चा, परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रमांत निमंत्रितांना प्रवास खर्च देण्यात येणार आहे. मात्र, कार्यक्रमातील निमंत्रित वगळता माजी संमेलनाध्यक्ष, निवडणूक लढलेल्या उमेदवारांसह सर्वांना फक्त संमेलनात उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. लवकरच सर्वांना निमंत्रणासह संमेलनाची कार्यक्रम पत्रिका रवाना करू. आम्ही खर्चात काटकसर करणार आहोत म्हणजे येणाऱ्यांना सतरंजीवर झोपायला लावू, असे नाही. निवास व भोजन व्यवस्था उत्तमच राहणार आहे, अशी हमी खोपकर यांनी दिली.   


सूचनांतून परिसंवादाचे विषय

संमेलनात कोणते कार्यक्रम आयोजित करावेत  याविषयी आम्ही सूचना मागवल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

बातम्या आणखी आहेत...