आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरडीसह पती- पत्नीची तलावात उडी घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपुरातील फुटाळा तलावात पती-पत्नीने पाच वर्षांच्या चिमुकलीसह आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. कौटुंबिक तणावातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत असला तरी आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. फुटाळा जलाशयाच्या काठावर फिरायला येणाऱ्या लोकांना तिघांचे मृतदेह आढळले. नीलेश शिंदे (३५), पत्नी रूपाली शिंदे (३२) आणि मुलगी निहाली शिंदे ( ५) अशी  मृतांची नावे आहेत. शिंदे कुटुंब तेलंगखेडी परिसरात राहत होते. शुक्रवारी रात्री  तिघांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. अंबाझरी पोलिसांनी या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक आणि वस्तीतील लोकांची विचारपूस केली. 
बातम्या आणखी आहेत...