आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात अवैध फेरीवाल्यांकडून महिलेचा विनयभंग, दाम्पत्याला बेदम मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सिताबर्डी बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी एका महिलेला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. 20 फेब्रुवारी रोजी भर दुपारी घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अनेक अवैध फेरीवाल्यांनी पीडितेला आणि तिच्या पतीला मारहाण करत असल्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.



पीडिता सीताबर्डी बाजारपेठेत रस्त्यावर उभे असलेल्या फेरीवाल्याकडून कपडे खरेदी केले होते. मात्र, ते अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे पीडिता आपल्या पतीसह ते बदलून घेण्यासाठी 20 फेब्रुवारीला दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी गेल्या. फेरीवाल्याने खरेदी केले कपडे बदलून देण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली. यानंतर फेरीवाले आणि पीडिता यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याच दरम्यान काही फेरीवाल्यांनी अश्लील शेरेबाजी सुरु केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पीडिता यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. पीडिता रस्त्यावर उभी असलेल्या पतीच्या दुचाकीवर बसू लागल्या. तेवढ्यातच फेरीवाल्याने पाठीमागे येत पीडितेला भिकारी संबोधले आणि तिच्या पतीला धक्का मारला.

 


पतीला वाचवण्यासाठी पीडिता समोर जाताच फेरीवाल्यांनी तिला मारहाण सुरु केली. पत्नीला मारहाण होताना पाहून पीडितेचा पती समोर गेला असता अनेक फेरीवाले त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांना जबर मारहाण केली. एका फेरीवाल्याने त्यांना पोटाच्या खालीही मारले.

 


घाबरलेल्या सोनकुसरे दाम्पत्याने त्वरित 100 नंबर डायल करत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. एकानंतर एक तीन कॉल केले. मात्र, पोलिस बरेच उशिरा आले. अखेर पुजा आणि अंकेश यांनी हाकेच्या अंतरावर असलेले सिताबर्डी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला पोलिसांनीही तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप या दाम्पत्याने केला.

 


तुम्ही हा वाद आपापसात मिटवा, असे पोलिसांनी सांगितले. मात्र सोनकुसरे दाम्पत्य त्यांच्या तक्रारींवर कायम राहिले आणि त्यांनी वरिष्ठांकडे धाव घेतल्याने रात्री 11 वाजता सिताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये फेरीवाल्यांविरोधात मारहाण, विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...