आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • क्राईम कॅपीटल: भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या; मेहुण्यानेच घडवून आणले हत्याकांड BJP Leader With 5 Family Member In Nagpur

नागपुरातील क्राैर्य..पार्टीसाठी बहिणीच्या घरी आलेल्या भावाने मेहुण्याचे कुटुंब संपवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पत्नीच्या हत्येच्या अाराेपाखाली तुरुंगात असलेल्या अाराेपीच्या सुटकेसाठी बहीण व मेहुण्याने खूप प्रयत्न केले. न्यायालयीन खटल्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च करून त्याची सुटका केली. मात्र नंतर अार्थिक अडचणीमुळे बहिणीच्या नवऱ्याने या पैशाची अाराेपीकडे मागणी लावून धरली तरी त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. फारच तगादा लावल्यावर अाराेपीने चक्क बहिण, मेहुण्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली.

 

मृतात अाराेपीच्या एका मुलाचाही समावेश अाहे. कमलाकर पवनकर (५१), पत्नी वंदना (४०) मुलगी वेदांती (१२) आणि आई मीराबाई (७२), भाचा कृष्णा पालटकर (२) अशी मृतांची नावे अाहेत, तर विवेक पालटकर असे आरोपीचे नाव आहे.


कमलाकर यांची लहान मुलगी मिताली आणि विवेकची मुलगी वैष्णवी दुसऱ्या खोलीत झोपलेल्या असल्यामुळे त्या सुदैवाने वाचल्या.  या भीषण हत्याकांडातून बचावलेल्या वैष्णवी आणि मिताली सोमवारी सकाळी जवळच राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी पोहचल्या. भेदरलेल्या दोघी काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यामुळे नातेवाईकांमार्फत पोलिसांनी रात्री घरात कुणी आले होते का, अशी त्यांना विचारणा केली. मितालीने मामा (आरोपी विवेक) होता, असे सांगितले. मामा रात्री मुक्कामी थांबला होता, मात्र भल्या सकाळीच तो निघून गेल्याचे तिने सांगितले. त्यामुळे पोलिसांना संशयाची कडी मिळाली. त्याआधारे तपास सुरू झाला. त्यानंतर पवनकर यांच्या नातेवाईकांनी आरोपीच्या पापाचा पाढाच पोलिसांसमोर वाचला.


हत्येमागील कारण काय?
कमलाकरची पत्नी अर्चना हिचा सख्खा भाऊ असलेल्या विवेकची गावाकडे वडिलोपार्जित जमीन आहे. पत्नीच्या हत्येच्या आरोपात न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली हाेती. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी कमलाकर यांनी बरीच धावपळ केली. त्याची मुले मिताली अाणि कृष्णा यांना स्वत:च्या मुलांप्रमाणे वाढविले. आरोपी विवेकला कारागृहातून बाहेर काढण्यासाठी तसेच कोर्टकचेरीच्या कामात त्यांनी सुमारे पाच लाख रुपये खर्च केले. कमलाकर यांनी केलेल्या या धावपळीमुळेच उच्च न्यायालयातून आरोपी विवेकची सुटका झाली होती. कारागृहातून सुटका झाल्यानंतर आरोपी विवेकचे बहिण अर्चना आणि जावई कमलाकर यांच्या घरी जाणे येणे होते. साधारणत: दर रविवारी त्यांची पार्टी होत होती. याच दरम्यान, कोर्टकचेरीसाठी खर्च झालेले सुमारे पाच लाख रुपये परत मिळावे म्हणून कमलाकर यांनी विवेककडे तगादा सुरू केला.

 

पैशासाठी विवेकला त्याची वडिलोपार्जित १० एकर शेती विकण्यास सांगितले होते. कारागृहात असेपर्यंत ‘तुम्हीच जमीन विका, तुम्हीच ठरवा. माझी कुठे सही पाहिजे ते सांगा’, असे म्हणणाऱ्या आरोपी विवेकने कारागृहातून बाहेर पडताच शब्द फिरवला. शेती विकण्यासाठी टाळाटाळ करतानाच वेगवेगळे बहाणे करीत होता. शेती विकण्याऐवजी त्याने एका जणाला मक्त्याने दिली. त्यातून मिळणाऱ्या रकमेतून परतफेड करील असे विवेक म्हणायचा. पाच लाखांची रक्कम अशा प्रकारे परत करण्यास खूप वर्षे निघून जातील, मला पैशाचे काम आहे, असे म्हणत कमलाकर आरोपी विवेकवर दबाव टाकत होते. त्यातून त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. कमलाकरने हा विषय आपल्या पक्षातील काही जवळच्या पदाधिकाऱ्यांनाही सांगितला
होता. मात्र, घरगुती विषय असल्याने त्यात कुणी हस्तक्षेप करण्याची तसदी घेतली नाही.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, आरोपी शोधण्यात श्वानपथक अपयशी...

बातम्या आणखी आहेत...