आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात बिल्डरच्या पत्नीची आत्महत्या; काँग्रेसच्या नगरसेवकसह फॅमिली फ्रेण्ड्सवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- बांधकाम व्यावसायिक राहुल नागुलवार यांची पत्नी पल्लवी हिने 9 मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पल्लवी यांनी आत्महत्या करण्‍यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली आहे.

 

फॅमिली फ्रेण्ड्‍सनी मानसिक त्रास देऊन आपल्याला आत्महत्या करण्‍यास प्रवृत्त केल्याचे पल्लवी यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. या प्रकरणी पल्लवी यांच्या सहा फॅमिली फ्रेण्ड्सविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात काँग्रेसचे नगरसेवक संजय महाकाळकर यांचा समावेश आहे.

 

पोलिसांनी नगरसेवक संजय महाकाळकर यांच्यासह अविनाश घुसे, राकेश तिडके, संजय गिलहुरकर, पंकज पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या... काय आहे प्रकरण?

बातम्या आणखी आहेत...