आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट पिस्तूल खरेदी करताना काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हातात बेड्या; 6 पिस्तूल, 12 राऊंड जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- देशी बनावटीच्या पिस्तूलची खरेदी-विक्री करताना काँग्रेस नगरसेवक सलीम सागवान याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. सलीम याच्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली. या घटनेने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

सूत्रांनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील रवी उमाळे हा शहरात गुरुवारी पिस्तुलाची तस्करी करण्यासाठी येत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रवी उमाळे याला शहरातील गुलीस्थानगरात बनावट पिस्तूल विक्री करताना रंगेहाथ अटक केली. उमाळेसह काँग्रेसचे नगरसेवक सलीम सागवान, राम शर्मा, तातू मुराब, निलेश सोनोरे या 4 जणांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. आरोपींकड़न 6 बनावट पिस्तुल, 12 राऊंड असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्‍यात आला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...