आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशन: कर्जमाफीसाठी शरीरसुखाची मागणी..निषेध, नीलम गोऱ्हेंचा हल्लाबोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- यंदा प्रथमच नागपुरात होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून (बुधवार) प्रारंभ होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या विदर्भवाद्यांनी नागपूर बंदची हाक दिली आहे.

 

LIVE UPDATES

- कर्जमाफीसाठी शरीरसुखाची मागणी होत असल्याच्या घटनांचा निषेध करतो. बँकांमध्ये संवेदनशीलता जपली जावी, यासाठी विशेष व्यवस्था व्हावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

- माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली. विरोधी पक्षनेते विखे पाटील, अजित पवार, गणपतराव देशमुख, एकनाथ शिंदे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.

-विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम तसेच काँग्रेस प्रवक्त रणदीप सुरजेवला यांच्यावर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. सिडकोच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री आणि लाड यांच्यावर आरोप केल्याबद्दल अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे.
 

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाडत पुढील काळात होणाऱ्या सामन्याचे जणू ट्रेलरच दाखवून दिले आहे. फडणवीस सरकारवर अपयशी कामगिरीचा आरोप करत विरोधी पक्षांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या वेळी व्यंगचित्रांमधून सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या कार्यपद्धतीवर टोलेबाजी केली.

 

1767 कोटींच्या कथित घोटाळ्यावरून खडाजंगी
धनंजय मुंडे - सिडकोतील जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेशिवाय जमिनीचे व्यवहार होऊ शकत नाहीत. याची हायकोर्टाच्या निगराणीखाली चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व धनंजय मुंडेंनी केली. या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे उघड करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

मुख्यमंत्री -'विरोधक अफवा पसरवत आहेत. पुरावे नसल्याने जुनी कागदपत्रे दाखवून घोटाळ्याचा आरोप करत आहेत. मात्र 1767 कोटींच्या कथित भूखंड घोटाळाप्रकरणी आपण पाहिजे त्या चौकशीला तयार आहोत. मुळात ही जमीन सिडकोची नसून राज्य सरकारचीच आहे,' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...विरोधी पक्षांनी व्यंगचित्रांमधून सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या कार्यपद्धतीवर अशी केली टोलेबाजी...

 

बातम्या आणखी आहेत...