आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या Farm House वर स्फोट, शेतमजुराचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा येथील शेतातील फार्महाऊसवर प्रेशर कुकरचा स्फोट होऊन एका शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. प्रदीप महादेव श्रीराव (वय- 45, रा. धापेवाडा) असे मृत कामगाराचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 

मिळालेली मा‍हिती अशी की, नितीन गडकरी यांची पत्नी कांचन गडकरी यांच्या मालकीची कांचन इंडिया ही सौंदर्य प्रसाधन कंपनी आहे. कंपनीसाठी आवश्यक उत्पादन त्यांच्या फार्महाऊस परीसरात घेतले जाते. हळद शिजवण्यासाठी कुकरचा वापर सुरू होता. अचानक स्फोट झाल्याने प्रदीप हे गंभीर जखमी झाले. त्यांना हॉ‍स्पिटलमध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

 

कळमेश्वर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूच्या घटनेची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर ‍क्लिक करून पाहा... संबं‍धित घटनेचे फोटो   

बातम्या आणखी आहेत...