आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाकडून भय्याजी जोशी यांची सरकार्यवाह पदावर फेरनिवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने एकमताने शनिवारी संघाचे विद्यमान सरकार्यवाह सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांची पुढील तीन वर्षांसाठी सरकार्यवाह पदावर फेरनिवड केली. गेल्या काही वर्षात संघाच्या व्यापात वेगाने झालेली वाढ आणि मिशन-२०१९ लक्षात घेऊनच जोशी यांची संघाकडून फेरनिवड झाल्याचे बोलले जात आहे. 

 

प्रतिनिधीसभा बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी असलेले मध्य प्रांताचे संघचालक अशोक सोवनी यांनी सरकायवाह पदासाठी प्रस्ताव मांडण्याचे आवाहन केले. संघ नेते जयंतीभाई भाडेसिया यांनी भय्याजी जोशी यांच्या नावाचा सरकार्यवाह पदासाठी प्रस्ताव मांडला. भय्याजी जोशी यांच्या कारकीर्दीत संघाची देशव्यापी प्रगती लक्षात घेऊन त्यांची फेरनिवड व्हावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. या प्रस्तावाला एकमताने संपूर्ण प्रतिनिधीसभेने अनुमोदन दिले. संघाचे माजी सरकार्यवाह स्व. हो. वे. शेषाद्री यांच्यानंतर चौथ्यांना या पदावर फेरनिवड झालेले जोशी हे दुसरे आहेत. 


भय्याजी जोशींच्या काळात संघाची प्रगती अधिक
भय्याजी जोशी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात संघाची देशव्यापी प्रगती झाली आहे. शाखांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. व्यावसायिकांसाठी मासिक, आठवडी शाखांसारखे उपक्रमही सुरू केले गेले. या उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. संघ परिवारातील संघटनांमध्ये समन्वय ठेवण्यातही जोशी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे मानले जाते.


 २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण संघ परिवार एकत्रितपणे भाजपच्या पाठिशी उभा करण्यात जोशी यांची महत्त्वाची भूमिका होती. 

 

भाजपाध्यक्षांच्या उपस्थित होईल निवड...

नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचा आज दुसरा दिवस आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या सभेला उपस्थित आहेत. संपूर्ण देशभरातून जवळपास 3000 प्रचारक नागपुरात दाखल झाले आहेत.

 

सरकार्यवाह यांची ही असते भूमिका...

- संघप्रमुख यांना सरसंघचालक असे संबोधले जाते. प्रमुख सल्लागार म्हणून ते आपली भूमिका पार पडतात. संघ चालवण्यासाठी सरकार्यवाहची आवशक्यता असते. संघात सरकार्यवाह हे एकच पद असते. या पदाला महासचिव असेही संबोधले जाते.

 

दत्तात्रय होसबळे प्रबळ दावेदार
- सूत्रांनुसार, संघाच्या सह सरकार्यवाह पदासाठी दत्तात्रय होसबळे हे प्रबळ दावेदार असल्याचे अखिल भारतीय कार्यकारी मंडळातील सदस्यांत चर्चा होती.

- होसबळे कर्नाटकातील असून ते आधीपासून संघात सहभागी आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी काम केले होते.

- होसबळे यांच्यासह सरकार्यवाह पदाच्या शर्यतीत सुरेश सोनी, डॉ. कृष्णगोपाळ आणि व्ही भागैया आहेत. सोनी यांची प्रकृती बिघडल्याने ते दोन वर्षांपासून सुटीवर आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...सरसंघचालक, सरकार्यवाह, सहसरकार्यवाह पदी सध्या कोण?

बातम्या आणखी आहेत...