आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषद निवडणूक मतदान पद्धतीबाबत सूचना, २१ मे रोजी मतदान; १४ मतदान केंद्रे निश्चित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पद्धतीविषयी जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांसाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. निवडणूक २१ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून, तहसील कार्यालय स्तरावर एकूण १४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

 

 

मतदारांनी मतदान केंद्रात मतदानासाठी प्रवेश करताना भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र किंवा स्थानिक प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र सोबत आणावे. याशिवाय दुसरे कोणतेही ओळखपत्र वैध पुरावा मानला जाणार नाही. मतदारांनी मतदान करताना निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेबरोबर दिलेले जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरावे. अन्य साधन वापरल्यास मतपत्रिका अवैध ठरेल. उमेदवारांना पसंतीक्रम देताना तो केवळ आकड्यातच लिहावा. बरोबर किंवा अन्य चिन्ह उमटवू नये. मतपत्रिकेवर नाव किंवा स्वाक्षरी किंवा ठसा किंवा अन्य काही लिहू नये. त्यामुळे मतपत्रिका अवैध ठरेल, आदी सूचना मतदारांना करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...