आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमात-ए-इस्लामी हिंदचा तिहेरी तलाक कायद्याला विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- केंद्र सरकारतर्फे आण्ण्यात येणाऱ्या तिहेरी तलाकच्या कायद्याला आमचा तिव्र विरोध असून, हा कायदा सरकारले त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सरचिटणीस इक्बाल मुल्ला यांनी पत्रपरिषदेत केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष तौफिक अस्लम खान आणि प्रसार विभागाचे सचिव इम्तियाज शेख उपस्थित होते. 


इस्लाम शांती, विकास आणि मुक्तीसाठी राज्यस्तरीय मोहीम आजपासून राज्यात सुरू झाली आहे. ही मोहिम २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तिहेरी तलाक निर्बंधाला तीव्र विरोध असून, हा कायदा तयार करण्यापूर्वी सरकारने देशातील सर्व मुस्लिम महिलांना विश्वासात घ्यायला हवे होते. तसे न करता काही लोकांचे मत घेऊन सरकारने हेकेखोरी दाखवत लोकसभेत हा कायदा आवाजी मतदानाने मंजूर करवून घेतला. आता राज्यसभेत हा प्रस्ताव रखडला असून, सरकार राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनिशी अध्यादेश काढून कायदा लागू करण्याच्या तयारित आहे. याला आमचा विरोध असल्याचे मुल्ला यावेळी म्हणाले. सलोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजे. सध्या एका वर्गाला अधिकार मिळत असेल तर दुसरा वर्ग नाराज होतो. यामुळे मनभेद होतात. हे थांबविण्यासाठी सरकारने समानता ठेवली पाहिजे, असे तौफिक अस्लम खान यांनी सांगितले.