आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारचा इतिहासाचे विद्रूपीकरण करण्याचा प्रयत्न; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निमित्ताने मराठा आणि दलित वाद निर्माण करण्याचा भाजपचा नियोजनबद्ध प्रयत्न होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नागपुरात बोलताना केला. 


हे प्रकरण स्टेट स्पॉन्सर्ड होते, असा दावा करून आव्हाड म्हणाले की, या घटनेनंतरही संभाजी भिडे यांच्यावर कारवाई झालेली नाही. सरकार आपल्याला हात लावणार नाही, याची भिडे यांनाही जाणीव आहे. त्यांना वाचवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, असे सांगताना उच्चशिक्षाविभूषित भिडे यांच्याकडे नेमकी कोणती पदवी आहे, याचा खुलासा होण्याची गरज असल्याचे आव्हाड म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि त्यांचा भाजप इतिहासाचे विद्रूपीकरणाचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजवर भाजपशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप फेटाळून लावत पवार हे कदापिही भाजपची हातमिळवणी करणार नाही हे आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती आहे, असा दावाही त्यांनी केला. पवार यांचे विचार पुरोगामी असून ते कधीच जातीयवाद्यांसोबत जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. 


मराठा आरक्षणाचे आंदोलन मागे पडलेले नाही. मात्र, या सरकारच्या काळात मराठा समाजाला न्याय मिळण्याची शक्यता नाही. धनगर समाजालाही आरक्षण मिळालेले नाही. त्याचप्रमाणे लिंगायत समाजाची वेगळा धर्म म्हणून मान्य देण्याची मागणीही मान्य होण्याची शक्यता नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 


भाजपला महाराष्ट्रात भीती वाटत असल्याने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका  एकत्र होण्याची शक्यता दिसत नसल्याचे त्यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले. सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश लोया यांचा नागपुरातील मृत्यूचे प्रकरण संशयास्पद असून तपास यंत्रणेनेच गोंधळाची स्थिती निर्माण केली असल्याचे आव्हाड म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...