आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात सूर्य 'प्रताप'; ब्रह्मपुरी तापमान ४७.५; अकोला ४४.६ तर अमरावतीचा पारा ४४.८

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भात सूर्याची भट्टी चांगलीच तापली आहे. सूर्याने आग ओकायला सुरूवात केली आहे. या आठवड्यात ऊन मी म्हणत आहे. रविवारी चंद्रपूर येथे गेल्या दशकातील कमाल ४७.४ व ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. सलग ४७ अंश सेल्सिअसच्यावर तापमान असण्याचा चंद्रपूरचा हा तिसरा दिवस आहे. 


सकाळी ९ वाजतापासून तापायला सुरूवात होते. रात्री आठ वाजताही गरम झळा सहन कराव्या लागत आहे. दुपारचे रणरणते उन पाहिल्यावर बाहेर निघायची हिंमत हाेत नाही. विदर्भात रविवार २० मे रोजी अकोला ४४.६, अमरावती ४४.८, वर्धा ४५.८, गोंदिया ४४.३, यवतमाळ ४४.६, नागपूर ४६.२ अंश सेल्सिअस इतके तापमान तर बुलडाणा येथे ४१.६ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...