आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमांडोचा गणवेश पाहून \'ती\' प्रेमात पडली, पण प्रियकराने असा केला असा घात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- दहा महिन्यांपूर्वी गाडगेनगरमधून २६ वर्षीय गर्भवती तरुणीच्या अपहरणानंतर गळा दाबून तिचा खून केला. मृतदेह कोरड्या विहिरीत जाळूून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची राख नदीत फेकल्याची कबुली अमित आकाशेने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी चौथा आरोपी नितीन प्रल्हाद श्रीराव (३० रा.सुलतानपूर ता.अचलपूर) याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे. नितीनच्या शेतामधील विहिरीत मृतदेह जाळण्यासाठी त्याने आरोपींना मदत केल्याचे समोर आले आहे. अमित हा गडचिरोली पोलिस दलात कार्यरत होता. दीड वर्षांपूर्वी योगायोगाने ती तरुणी व अमित नागपूरवरून एकाच बसमध्ये येत असताना अमितने कमांडो गणवेश परिधान केला होता. त्यामुळेच ती त्याच्या प्रेमात पडली व आम्ही मोबाईल क्रमांकाची देवाण घेवाण केली. त्यावेळीपासून यांचे संबध सुरू झाले. मात्र काही महिन्यांतच प्रेमसंबधात कटूता आली आणि अमितने प्रेयसीला संपवून टाकले. 


अमित गडचिराेली पेालिस दलात कार्यरत असताना 'सी - ६०' मध्ये होता. दरम्यान दीड वर्षांपूर्वी अमित कमांडो गणवेश परिधान करून अचलपूरला येण्यासाठी नागपूरवरून एका बसमध्ये बसला. त्याचवेळी त्या बसमध्ये योगायोगाने सदर युवती चढली. दोघेही जवळजवळ बसून आलेत. अमरावतीत येईपर्यंत दोघांनीही एकमेकांच्या मोबाईल क्रमांकांची देवाण घेवाण केली. त्यानंतर त्यांचे सातत्याने बोलणे, भेटणे सुरू झाले. मात्र काही महिन्यांतच अमितच्या मनात त्या युवतीबद्दल शंका उपस्थित व्हायला लागल्या. कारण अनेकदा रात्रीच्या वेळी तिचा मोबाईल क्रमांक त्याला व्यस्त येत होता. तसेच ती गर्भवती झाल्यानंतर तीन ते साडेतीन महिने सांगितले नाही. त्यानंतर लग्नाचा आग्रह करू लागली. असे अमितने पोलिसांना सांगितले आहे. यामुळेच अमितने कट रचून लहान भाऊ व मित्रांच्या मदतीने या युवतीचा काटा काढला. दुसरीकडे अमितने युवतीचा मृतदेह ज्या विहिरीत पुरला होता. त्या विहिरीत काही अवशेष मिळतात,का यासाठी गाडगेनगरचे पीएसआय शंकर डेडवाल व त्यांचे पथक मंगळवारी पुन्हा कामगारांच्या मदतीने विहिरीचे खोदकाम सुरू केले. 


पोलिसांचा निष्काळजीपणा
गर्भवती तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार वृद्ध पित्याने जुलै महिन्यात नोंदवली होती. त्यावेळी पोलिसांनी गांभिर्याने या प्रकरणाची दखल घेतली नसल्याचे आता पुढे येत आहे. 


निलंबन प्रस्ताव तयार 
पोलिसांनी अमित आकाशेसह त्याचा भाऊ मोहित तसेच अनुप हिरुळकर यांना अटक केली आहे. मोहित अमरावती ग्रामीण पाेलिस दलात कार्यरत आहे. या दोघांचाही अपहरण व खुनप्रकरणात समावेश असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी अमरावती व गडचिरोलीच्या एसपींकडे पाठवला आहे. तसेच मंगळवारी दोन्ही अधीक्षकांसोबत सींपींनी बोलून त्यांचे निलंबन करण्याबाबत चर्चा केल्याने हे दोघेही भाऊ लवकरच निलंबित होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...