आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन: मंत्र्यांच्या ताटात पंचपक्वान्न तर पोलिसांना वरण-भात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बंदोबस्ताकरिता असणाऱ्या पोलिसांना केवळ वरण-भाताचे जेवण देण्यात आले. त्याचवेळी मंत्र्यांच्या ताटात मात्र पंचपक्वान्न होते. त्यामुळे पोलिसांच्या नशिबी मात्र पूर्ण जेवणसुद्धा नाही, अशी स्थिती दिसून आली.

 

पोलिसांना चपाती, दोन भाज्या, वरण, भात, सलाड, लोणचे, पापड, एक मिठाई असा ‘मेनू’ ठरला आहे. परंतु, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेकडो पोलिसांना फक्त वरण-भातावरच आपले पोट भरावे लागले. हे जेवणही त्यांना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मिळाले. पोलिसांना आम्ही व्यवस्थित जेवण देत असल्याचा दावा पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.पण तो किती फोल आहे हे यानिमित्ताने दिसून आले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

 

बातम्या आणखी आहेत...