आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांचे खोटारडेपणाचे सर्वच पुरावे लवकरच मांडू; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांन इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘गेल्या पंधरा वर्षांच्या काळात ज्यांनी भ्रष्टाचार आणि अनागोंदीचा कारभार केला. शेतकऱ्यांना ज्यांनी नागवले तेच आता हल्लाबोल मोर्चा काढून ही परिस्थिती का ओढवली, असा उलटा प्रश्न विचारत आहे. मात्र आपण ‘हल्लाबोल’ करणाऱ्यांच्या ‘डल्लामारी’चे पुरावे सादर करू’, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.  िवधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत त्यांच्या खोटारडेपणाचे पुरावे एकेक करीत उघड करणार असल्याचे सांगितले.  


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘विरोधकांच्या शासन काळात राज्यात ५ हजार कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा झाला. यांच्या काळात तीन तीन वर्षे शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नव्हते. त्यांच्या काळातील पैसे आम्ही दिले. सर्व गोष्टी आॅनलाईन करून भ्रष्टाचाराला पायबंध घातला. आज आमचा कारभार पूर्णपणे पारदर्शी आहे. पण घोटाळे करणाऱ्यांचा पारदर्शकेवर विश्वास बसणार नाही’, असा टोला मुख्यमंत्र्यानी लगावला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफी फसवी असल्याचे आरोप विरोधक करीत आहे. त्यांचे आरोप पुराव्यानिशी खोडून काढू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  


सिंचन प्रकल्पांना अामच्या सरकारने गती दिली. िवदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे १०८ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण होतील. या शिवाय पंतप्रधान सिंचन योजनेतंर्गत भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. कोणत्याही विकास याेजनांना कात्री लावण्यात आलेली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नसल्याचे अाराेप विराेधकांकडून केले जातात. मात्र ते खाेटे अाहेत. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे राज्य शासनाच्या वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले. 


िवरोधक “सैराट’वरच अडले : िवरोधकांनी पत्रपरिषदेत सरकारवर केलेले आरोप पाहाता त्यांची टेप अजूनही ‘सैराट’वरच अडलेली दिसते. कोणीतरी त्यांना रिलिज झालेल्या नव्या चित्रपटांची नावे सांगायला हवीत. म्हणजे ते नवे काही मुद्दे बोलू शकतील, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विराेधकांची खिल्ली उडवली.  

 

पुढील स्‍लाइडवा वाचा, पटाेंलेंना राजीनाम्याचा पश्चात्ताप होईल ... 

बातम्या आणखी आहेत...