आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरपुड्यानंतर हुंड्यासाठी मोडले लग्न; नवऱ्या मुलासह 9 जणांवर गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो - Divya Marathi
सांकेतिक फोटो

अंजनगाव सुर्जी- साखरपुडा झाल्यानंतर मुलाकडच्या मंडळींनी हुंड्याची मागणी केली. वधूपक्षाने त्यास असमर्थता दर्शवताच वरपक्षाने लग्नच माेडले.  त्यावर हतबल वधूपित्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून पाेलिसांनी बुधवारी नवऱ्या मुलासह ९ जणांवर गुन्हा दाखल केला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे ही घटना घडली.  


तक्रारदाराच्या मुलीचे लग्न पारध बु. (ता. भोकरदन, जि. जालना) येथील रहिवासी पवन ऊर्फ मिथुन रामशरण श्रीवास्तव याच्याशी ठरले. १४ डिसेंबर राेजी साखरपुडाही झाला. वधूपक्षाने  मुलाला ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व १० ग्रॅमची चेन व कपड्यांसाठी ५० हजार रुपये दिले. सहा मे लग्नाची तारीखही काढण्यात आली. मात्र १७ जानेवारी रोजी वराचे काका किरण श्रीवास्तव यांनी वधूपित्याला फाेन करून दोन लाख रुपये व पाच तोळे सोने हुंडास्वरूपात देण्याची मागणी केली, न दिल्यास संबंध ताेडण्याची धमकीही दिली. त्यावर १८ जानेवारी रोजी वधूपिता पारध गावी केले. तेथे मुलाचे काका, मामा व इतर नातलग उपस्थित होते. वधूपक्षाने त्यांची विनवणी केली, परंतु वरपक्ष हुंड्याच्या मागणीवर ठाम हाेता. अखेर वधूपित्याने पोलिसांत तक्रार दिली.

 

यांच्यावर गुन्हा दाखल  
नवरा मुलगा पवन ऊर्फ मिथुन श्रीवास्तव, काका किरण श्रीवास्तव, काकू कीर्ती श्रीवास्तव, चुलत बहीण श्रद्धा, श्रुती, चुलत भाऊ शुभम, लखन (सर्व रा. पारध बु., ता भोकरदन), अात्याचा नवरा रमेश कायस्थ, आत्या पूजा ( दोघेही रा. नांदगाव, जि. नाशिक) अशा नऊ जणांवर हुंडाविरोधी गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

बातम्या आणखी आहेत...