आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ बिबट, १६ वाघ अन् १८९ अस्वलांचे दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा - संपूर्ण राज्यातील संरक्षित वनक्षेत्रात बुद्ध पौर्णीमेला वन्यजीव गणना आयोजित केल्या जाते. मात्र या वर्षी वन विभागाने केवळ मेळघाट व्याघ्र प्रकल्पातच वन्यजीव गणना आयोजित केल्याने ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया प्रारंभ होताच केवळ एका तासात वन्यप्रेमींनी प्रतिसाद देत बुकिंग पूर्ण केली होती. सोमवारी झालेल्या वन्यजीव गणनेत अकोट, गुगामल, सिपना, वन्यजीव विभाग, ज्ञानगंगा, काटेपूर्णाचा समावेश करण्यात आला होता. ऑनलाइन बुकिंग तासाभरात झाल्यानंतरही प्रत्यक्ष गणनेला अनेक वन्यप्रेमीं अनुपस्थित राहिल्याने बहुतेक मचाणेे रिक्तच होती. 

 

या वन्यजीव गणनेत ३०० मचानींवरून वन्यप्रेमींनी दिलेल्या नोंदणीनुसार १६ वाघ, २२ बिबट, १८९ अस्वल, २०९ बायसन, ३३७ सांबर, १३२ चितळ, १४८ भेकर, २१६ रानडुक्कर, ११ सायळ, २८ चौरसिंघा, १ तडस, ९९ निलगाई, १९६ माकडं, ४७ जंगली कुत्री, ४६ मसन्याउद अशा वन्यप्राण्यांची नोंद या गणनेत केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल, सिपना, अकोट या वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी, पक्षी, किटकंी गणना करण्याकरिता ५०० पाणवठ्यांवर सोमवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले होते. 

 


वन्यप्रेमींना प्लास्टिकच्या वेस्टनात दिले जेवण 
शासनाच्या वतीने प्लास्टिक बंदी असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवंाची गणना करण्याकरिता आलेल्या वन्यप्रेमींना याच विभागाने जेवण देत असताना प्लास्टिकमध्ये ते पॅक करून देण्यात आले. सोबत डिस्पोजल ग्लास व प्लेट देण्यात आले. याकरिता नागपूर, पुणे, मुंबईसह मध्यप्रदेश, छत्त्तीसगडवरूनही वन्यप्रेमींनी आपली उपस्थिती दर्शविली होती. ही गणना करण्याकरिता मेळघाट टायगर प्रकल्पाच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात आली होती. 


कागदी पॅकिंगचा वापर 
मेळघाटात वन्यप्रेमीनंा दोन वेळचे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. एक वेळचे जेवण कागदी पॅकिंगमध्ये देण्यात आले होते. प्लास्टिकचा वापर कुठेच करण्यात आला नाही. विशाल माळी, वनाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

बातम्या आणखी आहेत...