आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चरखा चालवण्यातून स्वावलंबनाचा संदेश; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिली भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘चरखा चालवल्याने शारीरिक श्रमासोबत मनही प्रसन्न होते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासोबत स्वावलंबनाचेही धडे मिळतात,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी रविवारी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिल्यानंतर काढले. सेवाग्राम आश्रमात आगमन झाल्यानंतर नायडू यांनी बापूकुटी, बाकुटी, आदिनिवास, आखरी निवासाला भेटी दिल्या. बाकुटी येथे भेट देऊन त्यांनी अभिप्रायही नोंदविला. त्यानंतर आदिनिवासाला भेट दिली.   


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९२६ मध्ये या अाश्रमात पिंपळाचे झाड लावले हाेते. या झाडाखाली बसून नायडू यांनी काही वेळ ध्यान केले. तसेच बापूकुटीमध्ये जाऊन प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर सेवाग्राम आश्रमाच्या वतीने सूत माळ, शाल आणि गीताई ग्रंथ देऊन नायडू यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी चरख्यावर सूतकताई केली. ‘चरखा चलाने में श्रम भी है. सक्रियता भी है और वस्त्र स्वावलंबन भी है,’ असे उत्स्फूर्त उद्गार त्यांनी काढले. 


शस्त्रक्रिया कक्षाचे उद््घाटन  
महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत नव्याने बांधण्यात आलेला शस्त्रक्रिया कक्ष तसेच स्किल लॅबचे उद्घाटनही  उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धीरूभाई मेहता, अधिष्ठाता डॉ. किसन पातोंड, आयुर्विज्ञान संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री आदी  उपस्थित होते. या वेळी डॉ. कलंत्री यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उपराष्ट्रपतींना संस्थेतील वैद्यकीय कार्याबाबत माहिती दिली. यात स्वस्त दरात देण्यात येणाऱ्या औषधी, माता व बाल आरोग्य केंद्र, शस्त्रक्रिया कक्ष आणि देण्यात येणाऱ्या सुविधा, रुग्णालयाची माहिती सुविधा, ग्रामीण भागात देण्यात  येणाऱ्या वैद्यकीय सेवा, आरोग्य विमा, कर्करोगावरील उपचार आदी बाबींचा त्यात समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...