आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात पाचव्या आरोपीला केली अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - फ्रेजरपुरा पेालिस ठाण्याच्या हद्दीतील एका चौदा वर्षीय युवतीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांपैकी तिघांना दोन दिवसांपूर्वी अटक केली. तसेच एकाला अल्पवयीन असल्यामुळे सोडण्यात आले. दरम्यान, या चौघांनी अत्याचार करण्यापूर्वी या युवतीला शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरात वलगाव येथे राहणारा एक २३   वर्षीय युवक भेटला होता. त्यानेही एका लॉजवर नेऊन युवतीवर अत्याचार केल्याचे पोलिसांच्या तपासात गुरूवारी (दि. २४) रात्री समोर आल्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. त्याला २८ मे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. सागर गोकुलसिंग ठाकूर (२३, रा. वलगाव) असे अटक केलेल्या पाचव्या आरोपीचे नाव आहे. १७ मे २०१८ ला दुपारी पीेडीत युवती तिच्या एका नातेवाईला भेटण्यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आली होती. त्याच ठिकाणी तिला सागर ठाकूर भेटला होता. 

बातम्या आणखी आहेत...