आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार बच्चू कडंूसह 5 जणांविरोधात गुन्हा; गोपाल तिरमारे यांच्या घरावरील हल्ला प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चांदूर बाजार नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाल तिरमारे यांच्या घरावर बुधवारी रात्री जमावाने हल्ला केला हाेता. या प्रकरणी तिरमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह पाच जणांवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला अाहे. अाराेपीत आमदार कडू यांच्यासह विशाल बंड (प्रल्हादपूर), सनी चवळे व सागर मोहोड (चांदूर बाजार) आणि माधान येथील शिशिर ठाकरे यांचा समावेश अाहे. प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी बुधवारी हातात रॉड घेऊन अापल्या घरावर हल्ला केला. तसेच माझ्या अाईला शिविगाळ केली, अशी तक्रार तिरमारे यांनी केली हाेती. दरम्यान, अामदार कडू यांनी मात्र हे अाराेप फेटाळले. अामच्याविराेधात राजकीय षडयंत्रामुळे गुन्हे दाखल केले जात असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...