आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅव्हल्समध्ये वाहकाचे प्रवासी तरुणीसोबत अश्लील चाळे, मध्यरात्री एक वाजता केले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अमरावती येथून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसमध्ये प्रवासी तरुणीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी कंडक्टर सतीश नाथे रा. पथ्रोट याच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी पीडित तरुणी पुण्याला जाण्यासाठी येथील वेलकम पॉईंटवरून वैष्णवी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमध्ये बसली. दरम्यान रात्री एक वाजताच्या सुमारास सतीश नाथे याने तरुणीशी अश्लील चाळे केले.

 

दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीने आपबिती वडीलांना सांगितली. त्यामुळे पीडित तरुणीच्या वडीलांनी बुधवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात सतीश नाथे विरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून नाथे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस याचा तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...