आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तिच्या' देहदानानंतर सुरू झाली चळवळ; तरुणाईचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा - वैद्यकीय शिक्षण घेऊन समाजातील गोरगरिबांची रुग्णसेवा करण्याचा 'ती'चा मानस होता. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. अकाली आलेल्या मृत्यूने रुग्णसेवेचे स्वप्न अपूर्णच ठेवत तिने इहलोकाचा प्रवास केला. मात्र जाता जाता समाजासाठी विधायक कामाचा मंत्र ती इतरांना देऊन गेली. ती स्वत: देहदान करून गेली. मात्र तिच्या पश्चात हा निर्णय तरुणाईसाठी चळवळ बनली असून आज अनेक तरुणांसह नागरिकांनी तिच्यापासून प्रेरणा घेत मरणोपरांत देहदान करण्याचा संकल्प करत आहेत.

 

ट्विंकल निखाडे, वय २० वर्षे, वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनून रुग्णसेवा करण्याचा घेतलेला ध्यास, परंतु जडलेल्या असाध्य आजाराने आलेला मृत्यू ट्विंकलचे स्वप्न अपूर्णच ठेऊन गेला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे राहणाऱ्या प्रा. डाॅ. विजया निखाडे यांची ट्विंकल ही मुलगी. बालपणापासून डॉक्टर बनण्याचा ध्यास तिने घेतला होता. बारावीनंतर सावंगी मेघे येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ती अंतिम वर्षाला शिकत होती. अचानक तब्येत खराब झाली आणि निदानाअंती तिला असाध्य आजार झाल्याचे निदान झाले. जगण्याची आस उराशी बाळगलेल्या ट्विंकलला मृत्यू आपली पाठ सोडणार नाही हे कळताच तिने आईजवळ मृत्यूनंतर तिच्या मृतदेहावर कुठलेही अत्यसंस्कार न करता तो तिच्याच महाविद्यालयाला दान करावा, जणेकरून भावी डॉॅक्टरांना तो सरावासाठी उपयोगी पडेल. तिची अंतिम इच्छा आईने पुर्ण केली. वर्षभरापुर्वी तिचा मृत्यू झाला, परंतु आजतागायत तिच्या मृतदेहावर तिच्याच महाविद्यालयातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे धडे घेत आहेत. तिच्यापासून प्रेरणा घेत समाजात देहदानाची चहवळ रुजावी म्हणून तिच्या काही मित्रांनी एक लघुचित्रपट बनविला असून त्यातून ते देहदानाबद्दल जनजागृती करत असल्याची माहिती अक्षय अहिव यांनी दिली असून मित्र परिवारही देहदान करण्यास सरसावला आहे.


कुटुंबीयांनी केला देहदान करण्याचा संकल्प
ट्विंकलचा देहदानाचा संकल्प पूर्ण केल्यानंतर तिची आई डॉ. विजया निखाडेंसह कुटुंबियांनीही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, देहदानाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून तिचा मृत्यू झाला, त्याच दिवशी देहदानचा संकल्प केला.
- प्रा. विजया निखाडे, आई

 

ही पहिलीच घटना
वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी मानवी देहाची आवश्यकता भासते. महाविद्यालयातील विद्यार्थीनीने देहदानाची रुग्णालयाची इतिहासात ही पहिली घटना असावी.

 

बातम्या आणखी आहेत...