आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिशीचा वाद: पत्रकाराच्या आई, मुलीची नागपुरात हत्या;घराजवळील किराणा दुकानदाराचे कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- शहरात एका पत्रकाराची आई आणि दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करून दोघींची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दोघींचे मृतदेह पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. भिशीच्या वादातून घराजवळील किराणा दुकानदारानेच दोघींची हत्या केल्याचे तपासात उघड झाले असून पोलिसांनी दुकानदाराला अटक केली आहे.


नागपुरातील एका वेब पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई  उषा सेवकदास कांबळे (५४) आणि मुलगी राशी (दीड वर्ष) या दोघीही  शनिवारी सायंकाळपासून दिघोरी परिसरातील पवननगर येथील निवासस्थानाजवळून बेपत्ता झाल्या. रात्रीपासून त्यांचा शोध सुरू होता.

 

हुडकेश्वर ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.  रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उमरेड मार्गावरील दिघोरी नाक्याजवळील नाल्यामध्ये दोन पोत्यात मृतदेह असल्याची माहिती एकाने पोलिसांना दिली. मृतदेहांवर शस्त्रांच्या जखमा होत्या. मोबाइल लोकेशनवरून पोलिस किराणा दुकानाजवळ पोहोचले तेव्हा दुकानदाराची कार नुकतीच धुतल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दुकानदाराची चौकशी सुरू केली. दुकानदार गणेश शाहू याच्या घरात अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आल्याने पोलिसांची मग खात्री पटली.

 

मोबाइल लोकेशनवरून पोलिसांनी लावला छडा
अपहरण करून खून केल्यावर मृतदेह पोत्यात कोंबून नाल्यात टाकण्यात आले होते. या घटनेचा सर्वच बाजूंनी तपास सुरू असताना उषा कांबळे यांच्या मोबाइल फोनचे लोकेशन घराजवळील शिव किराणा स्टोअर्सजवळ असल्याचे पोलिसांना लक्षात आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

बातम्या आणखी आहेत...