आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजाच्या रकमेवरून दोघांत वाद, धारदार शस्त्राने वार करून तरूणाचा निर्घृण खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- व्याजाच्या रक्कमेवरून १८ वर्षीय यश भरतीया या तरूणाची सोमवार सायंकाळच्या सुमारास गजबजलेल्या आर्णी नाका परिसरात भररस्त्यावर हत्या करण्यात आली. या प्रकारणात ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मारेकऱ्याने ऑन कॅमेरा ही बाब पोलिसांपूढे कबूल केली. विदर्भ हाऊसिंग परिसरात असलेल्या साई मंदिर जवळ यश भरतीया हा १८ वर्षीय तरूण आपल्या कुटूंबासह राहत होता. महिन्याभरापूर्वी यशची ओळख सिंघानीया नगरातील एका अल्पवयीन तरूणासोबत झाली होती. ओळखीच्या मदतीने त्या अल्पवयीन तरूणाने  यशकडून उसणवारीने तीन हजार रूपये घेतले होते. त्यानंतर काही दिवसानी यश याने दोनशे रूपये हप्त्याप्रमाणे व्याजाची मागणी केली. त्यानंतर काही दिवसातच त्या तरूणाने यशला तीन हजार रूपये परत दिले. मात्र, व्याजाची रक्कम वाढत गेली. दरम्यान यश हा आपल्या पैश्याची मागणी वारंवार करीत होता. याच पैश्यासाठी दोन वेळा यश आणि त्या अल्पवयीन तरूणाचा वादही झाल्याची माहिती आहे. 


अशातच सोमवारी सायंकाळी यश भरतीया पैसे घेण्यासाठी आपल्या एका मित्रासोबत आर्णी नाक्यावर गेला होता. त्यावेळी त्या तरूणासोबत वाद झाला. रागाच्या भरात यशने त्या तरूणाच्या कानशीलात लगावली. दरम्यान संतालेल्या त्या तरूणाने धारदार चाकू बाहेर काढल्याने यश व त्याच्या मित्राने पळ काढला. अशातच आर्णी नाक्यावर रोडच्या कामावरील एका पोत्यात यशचा पाय अडकल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर त्या तरूणाने यशला मारहाण करीत त्याच्या पाठीवर धारदार चाकूने सपासप वार केले. त्यानंतर यशला रूग्णालयात दाखल केले. यात त्याचा अतिरक्तस्त्राव झाल्याने शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी त्या तरूणाला ताब्यात घेतले आहे. 

बातम्या आणखी आहेत...