आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री रावल यांना वाचवणारे मुख्यमंत्री मि. क्लीन कसे? नाना पटोले यांचा नागपुरात सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील रावल सहकारी बँकेच्या ‘दरोडा’ प्रकरणी पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल व आणखी एक आमदारांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी या दोन्ही आरोपींना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे एसआयटी गुंडाळण्यात आली आहे. या आरोपींना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “मिस्टर क्लीन’ कसे, असा सवाल माजी खासदार व काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.     


काही वर्षांपूर्वी दोंडाईचा येथील रावल सहकारी बँकेवर दरोडा पडला होता. चौकशीत  दरोड्याचा बनाव करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते, असा आरोप पटोले यांनी केला. यामागे जयकुमार रावल व एका आमदाराचा हात होता. याप्रकरणी विशेष तपास पथकाचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाडवी यांनी अहवाल तयार केला आहे. याप्रकरणी या दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यासाठी अधिक पोलिस कुमक हवी असल्याचे पत्र प्रदीप पाडवी यांनी धुळे येथील पोलिस अधीक्षकांना २१ ऑगस्ट २०१५ रोजी दिले आहे. या पत्रावर कोणतीही कारवाई झाली नाही. या पत्रात आरोपींमध्ये दोन विद्यमान आमदारांचा समावेश असल्याचा उल्लेख पत्रात केला असल्याचे ते म्हणाले. 

 

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा     
धुळे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या दालनाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पटोले यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...