आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाना पटोलेंकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गोंदिया येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार आणि सध्या काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते नाना पटोले यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

नेमके काय घडले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातव्या राज्यस्तरीय अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात गोंदिया जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, असे विधान केले होते. 2017 मध्ये 18, तर 2018 मध्ये तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असे पटोलेंनी सांगितले. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असतानाही खोटं बोलून संतांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. पटोलेंनी गोंदियातील देवरी पोलिस स्टेशनमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...